Vedant Bhaskar - Sadguru PP Shrikrishna Dattatreya Deshmukh

Latest Version

Version
Update
Jul 21, 2017
Developer
Category
Installs
1,000+

App APKs

Vedant Bhaskar APP

'जो जनांमध्ये वागे । परी जनावेगळी गोष्टी सांगे । ज्याचे अंतरीं ज्ञान जागे । तोची साधू ॥' (दास. ६-१-१८) या वचनाची सत्यता ज्यांच्या रूपाने येते ते डॉ. श्रीकृष्ण दत्तात्रेय देशमुख उपाख्य डॉक्टरकाका. त्यांच्या रूपाने विद्यमान काळातही एका अत्यंत श्रेष्ठ जीवनमुक्त संताचे आपल्याला दर्शन होते.

प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिणारे व म्हणूनच आचार्य पदाला प्राप्त झालेले, तसेच सद्गुरूपदी विराजमान असलेले प. पू. डॉ. काका २१ व्या शतकातले संत आहेत. त्यांच्या कार्याची, साहित्याची ओळख व्हावी, त्यांच्या रसाळ वाणीचा व ज्ञानगर्भ प्रवचनांचा लाभ घेता यावा व उपनिषद ( वेदांत ) अभ्यासास जिज्ञासूंना साहाय्य व्हावे ह्या निखळ हेतूने हे Mobile Application तयार केलेले आहे. प. पू. काकांच्या शिष्यवर्गाला व इतरही साधकांना ह्याचा निश्चित उपयोग होईल असा विश्वास वाटतो.

हे Mobile Application सद्गुरू चरणी समर्पित !
Read more

Advertisement